ग्रामपंचायत कवठेपिराण योजना व अभियाने
- जगप्रसिद्ध मल्ल हिंदकेसरी जाकार्तावीर पैलवान मारूती माने (भाऊ) यांची जन्म भूमी.
- सलग ४५ वर्षे ग्रामपंचायत व इतर सहकारी संस्था बिनविरोध निवडून येतात.
- १०० टक्के निर्मल ग्राम गाव.
- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात प्रथम क्रमांक मिळणारे गाव.
- यशवंत ग्राम गाव.
- पर्यावरण विकासरत्न प्राप्त गाव.
- अस्पृश्यता निर्मुलन प्राप्त गाव.
- महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार प्राप्त गाव.
- व्यसनमुक्त गाव.
- २५७ महिला बचत गट असणारे गाव.
- कुस्ती क्षेत्रात व इतर खेळात वर्षाला राज्यस्तरावर व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवणारे गाव.
- सर्व धर्मियांसाठी एकच स्मशानभूमी.
- श्री. पै. भीमराव बाळासो माने (आण्णा) यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार
- अद्यवत ग्राम सचिवालय
- गावाअंतर्गत एकूण रस्त्यांपैकी ५०% रस्ते पेव्हिंग ब्लॉकचे
- ग्रामविकास मेळाव्याच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील सर्व ग्रा.प.सरपंच/ उपसरपंच/ सदस्य/ ग्रामसेवक यांना ग्रामविकासाचे प्रशिक्षण देणारे गाव
- तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम
- कृषी प्रदर्शन भरविणारे गाव