ग्रामपंचायत उपक्रम
सर्वांगीण ग्रामीण विकासासाठी शाश्वत उपक्रम राबवून प्रगत, सुरक्षित व स्वावलंबी ग्रामसमाज घडवण्याचा संकल्प.
गरिबीमुक्त गाव
स्थानिक रोजगार, शिक्षण आणि आर्थिक बळकटीमुळे गावातील गरिबी निर्मूलन.
आरोग्यदायी गाव
स्वच्छ परिसर, पौष्टिक आहार आणि जागरूकतेतून प्रत्येकासाठी सुरक्षित, निरोगी गाव.
बालस्नेही गाव
बालकांच्या सुरक्षितता, शिक्षण, पोषण व सर्वांगीण विकासासाठी अनुकूल ग्रामपरिसर निर्मिती
जलसंपन्न गाव
पाणी संवर्धन, साठवण आणि जबाबदार वापरातून शाश्वत जलव्यवस्थापन करणारे गाव.
स्वच्छ व हरित गाव
स्वच्छता, वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनातून प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक गावनिर्मिती.
पायाभूत सुविधांनीयुक्त स्वयंपूर्ण गाव
रस्ते, वीज, पाणी व सेवांनी सक्षम, आधुनिक आणि स्वयंपूर्ण गाव
सामाजिक न्याय व स्वयंपूर्ण गाव
समान संधी, सबलीकरण आणि सर्वसमावेशक विकासातून खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण व न्यायसंगत गाव.
सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव
सुरक्षा, पारदर्शकता व समुदाय सहभागातून सामाजिकदृष्ट्या विश्वासार्ह व सुरक्षित ग्रामव्यवस्था.
सुशासनयुक्त गाव
पारदर्शक, उत्तरदायी आणि नागरिक-केंद्रित प्रशासनाने आदर्श सुशासनयुक्त गाव निर्मिती