कवठेपिरान ! मल्लांच्या परंपरेचा अभिमान.
कामकाज वेळ: सकाळी १० ते ६

यशोगाथा कवठेपिरानची

सांगली जिल्हयाच्या नकाशामध्ये कृष्णा आणि वारणा नदिच्या खोऱ्यातील अनेक गावे समृद्ध बनली, बहरली, उल्लेखनिय कार्य करणारी, गावाला गावपणाची जपणूक देणारी गावे उदयास आली. या गावामध्ये अनेक लहान मोठ्या खेड्यांनी गावचा नावलौकीक चहुमुलखात पसरविला. या जिल्हयामध्ये प्रामुख्याने सर्व ग्रामसुधारणा ज्या गावात झाल्या ते गाव म्हणजे “आपले आदर्श गाव कवठेपिरान “

                          श्री सप्तर्षीच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजेच कवठेपिरान. वारणा नदिच्या पात्रा शेजारीच या गावाने राहणे पसंत केले. अनादि कालातरांची वस्ती असलेल्या गावाचा कालखंड फार जुना आहे, इ.सनाच्या १६ व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यातही या गावाचा उल्लेख आढळतो.पारंपारीक कृषीधनांवर पोसलेल्या कवठेपिरान गावाचा पूर्व इतिहास हालाखीचा आहे. वारणा नदिच्या सततच्या पूरामूळे व अनेक रोगराईच्या अस्मानी संकटानी गाव उठून आजच्या पूर्नरचित ठिकाणी विस्थापीत झालेला दिसतोय. सर्व धर्म समभाव या प्रमाणे अनेक जाती धर्माच्या कुंटुंबाच्या एकसंघपणाच्या राहणीमानाने आजही गाव सांघीक भावनेची जपणूक करणारा गांव म्हणून ओळखला जातोय. साधे राहणीमान व रांगडेपणा जपणारा गांव म्हणून ओळखतो.ग्रामदैवत सप्तर्षीच्या कृपाशिर्वादाने अनेक जिगरबाज माणसे गावाने दिली. जाकार्तावीर हिंद‌केसरी पै. मारुती माने (भाऊ) सारखा दैवीशक्तीचा हिरा या गावाने जगासमोर दिला. आपल्या कुस्तीच्या जोरावरती त्यांनी कवठेपिरानचे नांव साता-समुद्रापार नेले. ९९ व्या शतकातही अपरिचित असलेला गांव मात्र कुस्ती खेळाच्या जोरावरती परिचित झाल. कोरडवाहू कृषी व्यवसाय करणारे अनेक शेतकरी उपलब्ध कृषी व्यवसायातून मिळणाऱ्या पिकातूनच उपजीवीका भागवत असे.

जुन्या काळातील उपजत बुद्धी कौशल्यावर गाव- सुधारणेसाठी अनेक थोर-मोठ्या  लोकांनी प्रयत्न केला.  परंतु खऱ्या अर्थाने  ‘कुस्ती’ खेळाच्या जोरावर अनेक मल्ल कवठेपिरान मधिल ताबंड्या मातीच्या  आश्रयाला आले.
पै.मारुती माने यांच्या कुस्ती क्षेत्रातील लोकीक कामगिरीने हळूहळू गावचा इतिहास बदलत गेला. संघटित स्वरुप प्राप्त झालेल्या गावात अनेक चांगले निर्णय होत राहिले. ग्रामपंचायतीची स्थापना होवून पहिले सरपंच रामराव जाखलेकर यांना मिळाला व इथूनच यशस्वी ग्रामराज्याची सुरवात झाली होती. सांघीक भावना जपताना कवठेपिरान गावाने प्रत्येक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्यामध्ये विशेष उल्लेख करावा तो सलग ३५ वर्षे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करन्याने गावाने इतिहास रचण्याचे कार्य केले आहे.

 कवठेपिरान गावाने पूर्वीपासूनच नविन उल्लेखनिय-कार्य करत वेगळा ठसा उमटविला आहे. ग्रामपंचायती बरोबर गावातील सरकारी संस्थाच्या निवडणूकाही बिनविरोध करून पारदर्शक कारभार केल आहे. बारमाही वाहणाऱ्या वारणा नदिमुळे कोरवाहूचे क्षेत्र घडून बागायती क्षेत्रात वाढ झाली. पारंपारिक कृषी कार्याला बगल देवून नवोदित अनेक शेतकरी पुढे आले. ऊस पिकावर फोकस करून ऊसाबरोबर भाजीपाला शेतीस प्राधान्य दिले गेले, नगदी पिकाबरोबर गावाने पशुपालन व्यवसायास प्राधान्य दिले. यामुळे दुध-दुफत्याचा महापूर आला. या मुळे अनेक शेतकरी कुंटुंबाकडे चार पैसे यायला लागले, यामुळे गाव सधन बनू लागला गावचा विकास होवू लागला.

हिंदकेसरी पै. मारुती माने यांनी कुस्तीबरोबर गावाच्या सामाजिक गोष्टीकडे विकासात्मक दृष्टीने पाहून गावचा सर्वांगीण विकास केला. पै-मारुती माने यांच्या २५ वर्षे सरपंच पदाच्या काळात गावात अनेक सामाजिक सुधारणा घडवून आणल्या. पै. मारुती माने यांच्या निधना नंतर गाव पोरका झाला, त्यांच्या पश्चात गावाची परिस्थिती कशी होणार याची गावकरयाना चिंता वाटत असतानाच हिंदकेसरी मारुती माने यांचे पुतणे पै. भिमराव माने यांचे रूपाने एक दिव्य शक्ती व नवोदित ऊर्जा गावाला मिळाली.

वाल्यांचा वाल्मीकी बनून गावाला एक नवचैतन्य देणारा सरपंच मिळाला सरपंचपदाची सुत्रे हातात घेताच क्षणी गावाचा कायापालट करण्याचे स्वप्न उराशी बाळगून या गावची परिस्थितीत बदलण्याचा भिमराव मानेनी चंग बांधला. भौतिक सुविधांची वणवा असलेल्या गावात गलिच्छ व अस्वच्छता यामुळे गाव सारा अनेक रोगराईने गंजला होता. या करीता गावाला दिशा देवून बाहेर काढण्यासाठी व गावातील अस्वच्छता दूर करायाचे काम पै. भिमराव माने यांच्या रुपाने लाभले.

दहा हजार लोकसंख्या असलेल्या गावात, अपुरे रस्ते, तुंबलेल्या गटारी रस्त्यावरून वाहताना दिसत होत्या, पिण्याच्या पाण्याचा वणवा, अपुरे शौचालये, गावातील गल्ली बोळातून घाणीचे साम्राज्य या गावाची दुर्गधी धोकात्मक बनत चालली होती. याच काळात स्वच्छता अभियानाचा इंद्रधनुष्य यांनी हाती घेतले व स्वच्छता बरोबर गावातील माणसांची मने त्यांनी बदलली व एक नवेपरिवर्तन घडवून आणले.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातून संपूर्ण महाराष्ट्रात नविन प्रेरणा देणारे गाव कवठेपिरानने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला व २५ लाखाचे पारितोषिक मिळविले. 

स्वच्छता अभियानातील प्रथम क्रमांकाने स्वच्छताबरोबर गावातील अनेक लोकांची मनेही बदलली, संपूर्ण गावाचा कायापालट झाला. वैयक्तिक शौचालयाचा १००% वापरा मुळे सार्वजनिक हागणदारी मुक्त गाव निर्माण झाले. देशात एवढ्या मोठ्या लोक संखेच्या गावाला बहुधा ‘निर्मल गावाचा’ पुरस्कार प्राप्त झाला. महिला, अबालवृद्ध, तरुण, तरूणी, युवक मंडळे, मंड‌ळे, सर्व स्तरातील ग्रामस्थ यांच्या संघटीत प्रयत्नाने गावाचे नाव स्वच्छता अभियानामध्ये  प्रथम क्रमांक आल्याने याचे यशाचे भागीदार गावची जनता होती हे दिसून येते.  वेगवेगळे उपक्रम विविध योजनेतून गावचा चेहरा-मोहरा बदलत गेला. प्रत्येक गल्लीमध्ये पेविंग बॉक, डांबरीकरण, नविन गटारी बांधकाम, या प्रचंड कामामुळे गावचे रुपच पालटत गेले. सांडपाणी प्रकल्प, वृक्षारोपन, एकात्मिक बालविकासातून, अंगणवाडी संकूल उभारणी, नियमित पाणीपुरवठा, आदी योजना आणल्या. स्थानिय विकास समित्या, स्वयंसहायता गट यामुळे विकास घडतच गेला. शाश्वत विकासावरती भर देवून प्रधानमंत्री आवास योजना, सारख्या योजना पुढे आणल्या. सामाजीक विकासापाठोपाठ आर्थिक, शैक्षणिक, कृषी, सांस्कृतीक, क्रिडा आदी मध्ये गावाने नावलौकीक केला आहे. या सर्व कार्यामध्ये गावचे सरपंच सौ. अनिता माने, उपसरपंच, सर्व सदस्य, आदिचे मोठे योगदान असते.

असे हे गाव आज समृद्ध पंचायतराज अभियान व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियाना मध्ये पुन्हा सहभागी होवून मोठे काम हाती घेवून अर्जुन माळे सारखा तरुणाने वृक्षारोपनसाठी योग‌दान दिले आहे. यामुळे शाश्वत पर्यावरणाचा ऱ्हास होवून गाव पुन्हा सुजलाम सुफलाम बनणार आहे हे तेवढेच चिरकालीन सत्य आहे.

लेखन - राजेंद्र साकैखे कठेपिरान

ग्रामपंचायत कवठेपिराण सर्व साधारण माहिती.

गावचे नावकवठेपिरान
गावची लोकसंख्या10656
पुरुष लोकसंख्या5423
स्त्री लोकसंख्या5233
मागासवर्गीय लोकसंख्या1008
मागासवर्गीय पुरुष559
मागासवर्गीय स्त्री449
एकूण मतदार8353
पुरुष मतदार4359
स्त्री मतदार3994
अपंग संख्या111
जॉब कार्ड संख्या1152
एकूण भौगोलिक क्षेत्र2090.00 हे.
जिरायत क्षेत्र727.00 हे.
बागायत क्षेत्र१२५४ हे.
क्षारपड क्षेत्र३५५.१२ हे.
गावठाण क्षेत्र३३.५० हे.
पोटखराब क्षेत्र३७.३९ हे.
गायरान क्षेत्र६.०७ हे.
गावची मुख्य पिकेऊस, सोयाबीन व भाजीपाला, ज्वारी, गहू, हरभरा
गावचा एकूण आकार१९०००.००
पिण्याच्या पाण्याची सोयप्रा. पं. ची. पाणीपुरवठा योजना
बांधलेली इंदिया/प्रधानमंत्री आवास घरकुले365
गुरांची संख्या5740
स्वस्त धान्य दुकान2
विकास सोसा संख्या1
ग्रामपंचायत सदस्य संख्या17
जि. प. सदस्य
प. स. सदस्य
सरपंचसौ. अनिता भिमराव माने
सोसा. चेअरमनश्री. रघुनाथ विठ्ठल दिंडे
पोलिस पाटीलश्री. गणेश अप्पासो एडके
तलाठीश्री. जावेद मुलाणी
ग्रामपंचायत अधिकारीश्री. एल. ए. सनदी
प्राथमिक आरोग्य केंद्र1
खासगी दवाखाने5
दळणवळणाची साधनेएस. टी.
महिला मंडळ5
बचत गट210
जवळचे पोलिस स्टेशनकसबे डिग्रज
भूमिहीन शेतमजुर संख्या१९२
तरुण मंडळ संख्या५५
गावचा बाजाराचा दिवसगुरुवार
सार्वजनिक यात्रा दिवसमाग शुद्ध अष्टमी
हॉटेल संख्या
मोबाइल टॉवर संख्या
स्वातंत्र सैनिक१३
संजय गांधी योजना लाभार्थी संख्या२९५
तालीम संख्या
दारिद्र्य रेषेखालील कुटुंब संख्या३६३
शैक्षणिक सुविधाप्रा. शाळा ३ माध्यमिक २
अंगणवाडी संख्या१३
मुकबधीर शाळाशाळा १, विद्यार्थी : २५
एकूण मतदार संख्या8५७८ (पु. स्त्री)
PM-Kisan लाभार्थी संख्या (शेतकरी)2270
भूमिहीन१२७
पाणंद रस्ते१) बापू चावरकेर ते आडवात १५०० चौ. मी.
२) आडवात ते कांदवाडी शिव १००० चौ. मी.
३) जुना डिग्रज रस्ता १९०० चौ. मी.
४) नंदनकी रस्ता १००० चौ. मी.
५) गंजिखाना ते येवले मळा १२०० चौ. मी.
६) गणपती मंदिर ते आडवात १२०० चौ. मी.
७) गणपती मंदिर ते पांजपोलन १५०० चौ. मी.
गावची नदीवारणा नदी
गावचे वैशिष्ट्यके. जकातवीर हिंदकेसरी मारुती माने (भाऊ), संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राज्यात प्रथम सन् २००४/०५ निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त, तंटामुक्त अभियान पुरस्कार जाहिर, जागृत सातसय्यद(सप्तर्षी) देवस्थान
एकूण कुटुंब संख्या२२६३
वैयक्तिक शौचालय असणारी संख्या२२६३
शौचालय नसणारी कुटुंब0
सार्वजनिक शौचालय१० युनिट
निर्मल भारत अभियान अंतर्गत१६६
बायोगॅस संख्या१३०
सौर पथदिवे४६
एल. ई. डी. पथदिवे / सी. एफ. एफ.७८७